आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुप सजलेले...:खास फोटो शेअर करुन सोनाली म्हणाली - 'कुठल्याही सिनेमासाठी, जाहिरातीसाठी नाही, कार्यक्रमासाठी नाही तर हा श्रृंगार आहे माझ्या साखरपुड्यासाठी...'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कांजीवरम साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यामध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा झाला आहे. आपल्या वाढदिवशी म्हणजे 18 मे रोजी सोनालीने तिच्या साखरपुड्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावर्षी 2 फेब्रुवारीला दुबईत त्यांचा साखरपुडा झाला. ही खास गोष्ट उघड करण्यासाठी सोनालीने तिच्या वाढदिवसाचा मुहूर्त गाठला. ही गोड बातमी दिल्यानंतर सोनालीने तिच्या साखरपुड्याचे खास फोटोदेखील शेअर केले.

अतिशय मोजक्या लोकांमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. या खास दिवसासाठी केलेल्या श्रृंगाराचे फोटो सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोनेरी रंगाची कांजीवरम साडी, केसात माळलेला गजरा, पारंपरिक दागिने आणि साजेसा मेकअप... या रुपात सोनाली अतिशय सुंदर दिसली.  

कांजीवरम साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यांमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. 

साखरपुड्यासाठी सोनालीने पारंपरिक लूकलाच पसंती दिली. 

साखरपुड्याला सोनाली आणि कुणालचे कुटुंबीय उपस्थित होते. 

कुणाल बेनोडेकर हा लंडनचा असून कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.  

वाढदिवसानिमित्त सोनालीने तिच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...