आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्ट मॅरीड:लग्नाच्या बेडीत अडकली 'अप्सरा',  जुलै महिन्यात ठरलेलं लग्न 'या' कारणामुळे मे महिन्यात प्रीपोन केलं; जाणून घ्या तिच्या जोडीदाराविषयी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी वाढदिवशी सोनाली कुलकर्णी कुणालसोबत लग्नाच्या बेडीत अडकली.

मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी वाढदिवशी लग्नबंधनात अडकली. 18 मे रोजी सोनालीचा 33 वाढदिवस होता. वाढदिवसाचे खास औचित्य साधत तिने कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली. अतिशय साध्या पद्धतीने दुबईत दोघांचे लग्न झाले. विशेष म्हणजे या लग्नाला सोनाली आणि कुणाल यांचे आईवडील ऑनलाईन हजर होते. सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन लग्नाचे फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. खरं तर जुलै महिन्यात त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र अवघ्या दोन दिवसांत दोघांनी 18 मे रोजी लग्न करण्याचा िनर्णय घेतला. आपल्या पोस्टमध्ये सोनालीने लग्नाविषयीच्या अनेक खास गोष्टी उलगडल्या आहेत.

काय म्हणाली सोनाली?

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सोनालीने लग्नातले काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत ती म्हणाली, “अब से हम ‘7’ ‘मे’. आम्ही जून मध्ये यूके ला लग्न करणार होतो यूकेच्या दुस-या लाटेमुळे तारीख पुढे करावी लागली, मग लग्न स्थळाच्या उपलब्धतेनुसार जुलै मधली तारीख ठरली. कुणाल बरोबर लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले, आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही! जुलैपर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून.. क्वारंटाइन, प्रवासावरील बंदी, कुटुंबासाठी असणारी रिस्क, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ रद्द करायचा निर्णय घेतला. जुनचं जुलै होतंय, म्हणलं पोस्टपोन करायच्या ऐवजी जुलैचं मे मध्ये प्रीपोन करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ. आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही🙏.🏻 आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणाल चे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही... आताच शिक्का मोर्तब करून टाकू. दोन दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि 15 मिनिटांत चार लोकांच्या साक्षीने मंदीरात, वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून (लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) मॅरेज सर्टिफिकेटवर साइन केलं. पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल, तेव्हा, तिथे, तसं, फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर सगळ्या विधीनिशी आमची ड्रीम वेडिंग करूच. तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.''

कोण आहे कुणाल बेनोडेकर
सोनालीचा पती कुणाल बेनोडेकरला 'केनो' या नावानेही ओळखतात. कुणाल लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. त्याचे शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झाले. त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...