आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना योद्धांना तेजस्विनीचा सलाम:'तुझ्या स्वच्छ श्वासासाठी देह हा माझा सदैव उभा... ', नवरात्रीच्या तिस-या दिवशी तेजस्विनी पंडीतचे सफाई कर्मचा-यांच्या कार्याला दंडवत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवरात्रीच्या तिस-या दिवशी तिने समस्त सफाई कर्मचा-यांना सलाम केला आहे.

आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते. यंदा ती कोरोनायोध्द्यांना आपल्या फोटो Illustration मधून ट्रिब्यूट देत आहे. तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांना आणि दुस-या दिवशी पोलिसांना आदरांजली वाहिल्यावर नवरात्रीच्या तिस-या दिवशी तिने समस्त सफाई कर्मचा-यांना सलाम केला आहे.

हातात झाडू घेऊन रस्त्यावर उभी ठाकेलेली रणरागिणी आपल्या फोटोमधून तेजस्विनीने साकारलीय. तेजस्विनीच्या या फोटोशूटची झलक तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बघायला मिळतेय. ''मला ना lockdown ची सुट्टी ना work from home ची मुभा तुझ्या स्वच्छ श्वासासाठी देह हा माझा सदैव उभा देह हा माझा सदैव उभा.....'' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

तेजस्विनी पंडित तिस-या दिवशीच्या फोटोशूटविषयी सांगते, “दुर्गामातेने आपल्या शक्तीशाली त्रिशुळाने असुराचा वध केला होता. कोरोनारूपी असूराला पळवून लावायचे असेल, तर स्वच्छता आणि सॅनिटायझेशन महत्वाचेच ना.. कोरोना काळात स्वच्छता कर्मचा-यांच्या हातातल्या मोठ्या झाडुने ही त्रिशुळाचेच तर काम केले होते. त्यांच्यातल्या त्या दैवी कर्मांमुळेच तर आपण प्रत्येक गल्ली-बोळात, गावात, पाड्यात, शहरात स्वच्छता पाहू शकतोय.”

तेजस्विनी पंडित पुढे म्हणते, “आपण लहानपणापासून ऐकलंय, जिथे स्वच्छता असेल. तिथेच लक्ष्मीचा वास असतो. आणि वर्षाचे 365 दिवस दारोदारी स्वच्छता करण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात. त्यांच्यातल्या दैवीरूपाला माझे या फोटोशूटव्दारे नमन.”

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांना तिच्या दरवर्षाच्या या कल्पक फोटोशूटची उत्सुकता असते. आणि सध्या कोरोनायोद्धांना ती वाहत असलेली आदरांजली रसिकांच्या खूपच पसंतीस पडत आहे.

बातम्या आणखी आहेत...