आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रौत्सव स्पेशल फोटोशूट:'दुखावलेल्या लेकरांना समजेल का माझी ही रुग्णसेवा?....', नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तेजस्विनीने रूग्णवाहिका सेवा पुरवणा-यांचे मानले आभार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तेजस्विनीने रूग्णवाहिका सेवा पुरवणा-यांचे आभार मानले आहेत.

कोरोना काळात सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव ठेवत अविरत जनसेवा करणा-या कोरोना योद्धांविषयी यंदाच्या नवरात्रीमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित कृतज्ञता व्यक्त करत आहे. डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, शेतकरी आणि प्राणीमित्रांचे आभार व्यक्त केल्यानंतर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तेजस्विनीने रूग्णवाहिका सेवा पुरवणा-यांचे आभार मानले आहेत.

रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी इच्छितस्थळी देवासारखे धावून येऊन डॉक्टरांपर्यंत पोहोचवणा-या रूग्णवाहिका अत्यंत मोलाची कामगिरी बजावतात. कोरोना काळात तर ‘सोशल डिस्टसिंग’च्या कारणास्तव माणूस माणसापासून दूर गेला असताना, रूग्णवाहिकांनी कोरोना रूग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायची जबाबदारी अतिशय दक्षपणे आणि अहोरात्र चालवली. त्यामुळे तेजस्विनी पंडितने षष्ठीला या ‘दैवी’ कर्म करण्याची प्रेरणा घेऊन काम केलेल्या रूग्णवाहिका चालकांचे आभार मानले आहेत.

तेजस्विनी पंडित म्हणते, “कोरोना झाल्यावर रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करू शकत नाही. तुम्हांला बरं नसताना, तुमचे आपले नातेवाईकही तुम्हाला हात धरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवू शकत नाही. अशावेळी एकाकी पडलेल्या रूग्णांना खरा मदतीचा हात दिला तो या रूग्णवाहिका चालकांनी. आपला जीव धोक्यात घालून हजारो रुग्णांना त्यांनी जीवनदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले.“

तेजस्विनी पुढे म्हणते, “आज आपण कोरोना योद्धांमध्ये पोलिस, डॉक्टरांची नाव आवर्जून घेतो. पण रुग्णवाहिका चालकांच्या या ‘खारी’च्या वाट्याला मात्र आपण विसरलो आहोत. जसा खारींनी प्रभु रामचंद्रांना सेतू बांधायला मदत केल्यामुळेच तर असत्यावर सत्याचा विजय झाला. तसंच कोरोनारूपी रावणाला हरवायला, रूग्णवाहिकांनी उचललेला वाटा खूप महत्वाचा आहे.”