आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रौत्सव स्पेशल फोटोशूट:'मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा...', तेजस्विनी पंडितने भारतीय सैनिकांना आदरांजली देताना चीनच्या दुष्ट प्रवृत्तीवर केला घणाघाती हल्ला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय सैन्याला अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या सातव्या दिवशी फोटोच्या माध्यमातून आदरांजली दिली आहे.

अवघ्या जगाला 2020मध्ये कोरोनाचा भयंकर आजार देणा-या चीनने गलवान खो-यात भारतीय सैनीकांवर भ्याड हल्ला केला होता. भारतीय सैन्याने त्यानंतर चीनला पळता भुई थोडी केली. देशाच्या करोडो जनतेचे संरक्षण करणा-या या भारतीय सैन्याला अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या सातव्या दिवशी फोटोच्या माध्यमातून आदरांजली दिली आहे. रणरागिणीच्या रुपात शत्रूच्या चिंधड्या करणा-या तेजस्विनीला पाहून काली मातेचाच भास होतो आहे.

View this post on Instagram

सप्तमी . . बळी पडली निष्पाप लेकरे , तुझ्या देशीच्या विषाणूने अन् आता गिळू पाहतो आहेस माझी मातृभूमी, तुझ्या राक्षसी महत्वकांक्षेने ? मोडू नकोस बांध आता माझ्या सहनशक्तीचा.. नाहीतर उडवीन तुझ्या चिंधड्या हजार गोठला जरी थेम्ब न थेम्ब रक्ताचा. . . 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 : 𝐓𝐡𝐢𝐬 𝐢𝐬 𝐚𝐧 𝐚𝐫𝐭𝐢𝐬𝐭𝐢𝐜 𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐞 𝐨𝐧 𝐦𝐲 𝐛𝐞𝐡𝐚𝐥𝐟 𝐭𝐨 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐰𝐚𝐫𝐫𝐢𝐨𝐫𝐬 (𝐢𝐫𝐫𝐞𝐬𝐩𝐞𝐜𝐭𝐢𝐯𝐞 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞𝐢𝐫 𝐠𝐞𝐧𝐝𝐞𝐫) 𝐝𝐮𝐫𝐢𝐧𝐠 𝐂𝐨𝐯𝐢𝐝 𝟏𝟗 𝐭𝐡𝐚𝐭 𝐡𝐚𝐯𝐞 𝐛𝐞𝐞𝐧 𝐰𝐨𝐫𝐤𝐢𝐧𝐠 𝐬𝐞𝐥𝐟𝐥𝐞𝐬𝐬𝐥𝐲. . . Design & Illustration : @indian_illustrator Photographer : @vivianpullan Writer : @rjadhishh_live Concept & Director : @dhairya_insta_ . . #navratri2020 #devi #देवमाणसं #दैवीकर्म #सैनिक #devbarekaro #coronawarriors #thankyou #warincovidtimes #indianarmy #armedforces #defenceforces #bsf #jaijawaan #navy #airforce #indianarmedforces #tejaswwini #gratitude #tribute

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on Oct 22, 2020 at 9:33pm PDT

तेजस्विनी पंडित म्हणते, “महासत्ता बनण्याची स्वप्न पडू लागलेल्या चीनने भारताला आगीतून फुफाट्यात लोटलं. आधीच कोरोनाच्या आगीत होरपळत होतो, त्यात ऐन लॉकडाऊनमध्ये भारतीय सैनिकांवर त्यांनी ज्यापध्दतीने हल्ला केला आणि त्यांना ज्याप्रकारे छळून मारलं. ते ऐकुन हृदय पिळवटून जाते. पण असे भ्याड हल्ले परतवायला समर्थ असलेल्या भारतीय सैन्यानेही हे आक्रमण यशस्वीपणे परतवून शत्रूला धूळ चारली. आज त्यांच्यामूळेच आपण घरात सुरक्षित राहू शकतोय.”

तेजस्विनी पंडित पुढे सांगते, “अख्खा देश स्वत:ला ‘सेफ’ ठेवण्यासाठी घरी बसलेला असताना आपले प्राण देशासाठी अर्पण करणा-या, आपल्यासाठी मरणयातना भोगायला मागे-पुढे न पाहता लढणा-या, भारतीय सैनिकांच्या ऋणातून मुक्त होणं, शक्य नाही. पण त्यांना ही आदरांजली.”