आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जस्ट एंगेज्ड:'मराठी बिग बॉस' फेम सई लोकूर लवकरच अडकणार लग्नबंधनात, तीर्थदीप रॉयसोबत झाला साखरपुडा, बघा सोहळ्याचे खास फोटोज

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सईने ही गोड बातमी आपल्या सर्व चाहत्यांना दिली होती.

मराठी बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सई लवकरच विवाहबंधनात अडकणार असून शुक्रवारी तिचा साखरपुडा झाला.

या छोटेखानी सोहळ्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केले आहेत.

सईच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव तीर्थदीप रॉय असे आहे. तीर्थदीप कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

साखरपुड्याला सईने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. सईने मेंदीचा फोटोदेखील शेअर केला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सईने ही गोड बातमी आपल्या सर्व चाहत्यांना दिली होती.

परंतू त्यावेळी सईने आपल्या जोडीदाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते.

जाणून घ्या सईविषयी...
सई लोकूरने 'कुछ तुम कहो कुछ हम कहे' या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. फरदीन खान नायक असलेल्या या चित्रपटात सईने फरदीनच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. इतकेच नाही तर 'पकडा गया' या सई परांजपे यांच्या तर 'मिशन चॅम्पिअन' या तिच्या आईच्याच प्रॉडक्शनचा चित्रपटात सईने बालकलाकार म्हणून काम केले आहे.

हिंदी चित्रपटातही केले आहे काम
सईने 2015 साली आलेल्या 'किस किस को प्यार करु' या चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत भूमिका केली होती. यात सईने त्याच्या पत्नीची भूमिका केली होती. सईला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि आईच्या मार्गदर्शनाखाली सईने अनेक नाटकांत काम केले आहे. सईची आई वीणा लोकूर या प्रसिद्ध फिल्ममेकर आहेत.

या चित्रपटात केले आहे काम
सईने आतापर्यंत प्लॅटफॉर्म, आम्ही तुमचे बाजीराव, पारंबी, जरब, मी आणि यु या चित्रपटांत काम केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser