आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे:लवकरच येतोय 'आपला मराठी बिग बॉस', तिस-या सीझनमध्ये घरात कुणा-कुणाची होणार एंट्री?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

अभिनेता सलमान खानने नुकताच 'बिग बॉस' या रिअ‍ॅलिटी शोच्या 14 व्या सीझनचा प्रमोशनल व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यामुळे हिंदीतील या शोबद्दलची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. ही उत्सुकता असतानाच आता दुसरीकडे मराठी बिग बॉसच्या तिस-या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. शोचा टीझर कलर्स मराठी वाहिनीने रिलीज केला आहे. पहिल्या दोन पर्वांच्या यशानंतर आता तिस-या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तिस-या पर्वात कोण कोण स्पर्धक म्हणून सहभागी होणार हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजयी झाली. यानंतर दुस-या पर्वात अमरावतीच्या शिव ठाकरेने बाजी मारली होती. तर दोन्ही पर्वात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. दोन्ही पर्वातील त्यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांसह स्पर्धकांना आवडले होते. त्यामुळे तिस-या पर्वातही त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व कधी सुरु होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हे पर्व सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिग बॉसच्या घरात जवळपास 15 स्पर्धक एकत्र राहतात. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन कसे होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

एकंदरीतच भांडण, द्वेष, प्रेम आणि स्पर्धा या सगळ्यांचे मिश्रण असलेल्या या रिअ‍ॅलिटी शोची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असणार हे काही वेगळे सांगायला नको.