आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रिटी गणेशा 2020:मराठी सेलिब्रिटींच्या घरी झालं गणरायाचं आगमन, कलाकारांनी उत्साहात केलं लाडक्या बाप्पाचं स्वागत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री अमृता खानविलकर, गायत्री दातार, सागर कारंडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.
  • दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान झालेत.

आज (22 ऑगस्ट) सर्वत्र गणरायाचे आगमन होत आहे. याकाळात लोक आपल्या कामात कितीही बिझी असले तरीदेखील बाप्पाच्या आगमनासाठी कामापासून थोडा ब्रेक नक्कीच घेतात. यंदा कोरोनाचं सावट असलं तरीदेखील सामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वच जण हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. अनेकांनी शूटिंगपासून सुटी घेतली आहे. बाप्पासाठी घरी मोदक, पुरणपोळीचा नैवेद्य केला जातोय. शिवाय सुंदर आरासदेखील तयार केलेली दिसतेय. अनेक सेलिब्रिटींच्या घरी दीड आणि पाच दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, श्रेया बुगडे, सागर कारंडे, सुबोध भावे, जुई गडकरी, वैदेही परशुरामी, गौतमी देशपांडेसह अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा पावणचारासाठी आले आहेत. हे सर्व सेलिब्रिटी इको-फ्रेंडली गणेशोत्सवर साजरा करत आहेत. या सेलिब्रिटींच्या गणपती सेलिब्रेशनची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या बाप्पासाठी फुलांची आरास केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या बाप्पासाठी फुलांची आरास केली आहे.
अभिनेता शरद केळकर आपल्या बाप्पासह
अभिनेता शरद केळकर आपल्या बाप्पासह
अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरचा बाप्पा.
अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरचा बाप्पा.
अभिनेता सुबोध भावेच्या घरी बाप्पा झाले विराजमान.
अभिनेता सुबोध भावेच्या घरी बाप्पा झाले विराजमान.
बाप्पासोबत श्रेया बुगडेचा हा सुंदर फोटो
बाप्पासोबत श्रेया बुगडेचा हा सुंदर फोटो
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या घरी विराजमान झाले गणराया
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या घरी विराजमान झाले गणराया
अभिनेत्री वीणा जगताप
अभिनेत्री वीणा जगताप
अभिनेत्री जुई गडकरी आपल्या बाप्पासह
अभिनेत्री जुई गडकरी आपल्या बाप्पासह
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे
अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या पतीसोबत दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते.
अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या पतीसोबत दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते.
अभिनेत्री वैदेही परशुरामी हिच्या घरी बाप्पा झाले विराजमान
अभिनेत्री वैदेही परशुरामी हिच्या घरी बाप्पा झाले विराजमान
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बाप्पासाठी सुंदर आरास केली आहे.
अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बाप्पासाठी सुंदर आरास केली आहे.
अभिनेत्री रुपाली भोसले
अभिनेत्री रुपाली भोसले