आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:फिट अ‍ॅण्ड फाईन अभिनेत्री रीना मधुकर; हेल्थी लाईफस्टाईलसाठी रीना नेमके काय करते?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री रीना मधुकर हिने आतापर्यंत हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' मालिकेत काम करते आहे. रीना ही उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याचबरोबर ती एकदम फिट अँड फाईन अभिनेत्री आहे. हेल्थी लाईफस्टाईलसाठी रीना नेमके काय करते, तिचे वर्कआऊट रुटीन कसे असते हे सर्वकाही जाणून घेऊयात तिच्या कडूनच..

1. तुमच्या आयुष्यात फिटनेसला किती महत्त्व आहे?
माझ्यामते, आपल्या रोजच्या, दैनंदिन जीवनात जेवढी अन्न, पाणी, झोप या मूलभूत गोष्टींची जेवढी गरज असते तेवढीच गरज फिटनेसची असते. मुळात व्यायाम हा दैनंदिन जीवनशैलीचा, लाईफस्टाईलचा एक भाग आहे.

2. एक अभिनेत्री म्हणून अभिनय आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी तुम्ही कशाप्रकारे सांभाळता?
मुळात ते टाईम मॅनेजमेंट असतं. जसं कामाला प्राधान्य दिलं जातं तसंच फिटनेसलाही प्राधान्य दिलं जातं. मी व्यायामासाठी, फिटनेससाठी आवर्जुन वेळ काढते. एक अभिनेत्री म्हणून मी असं म्हणेन की माझ्यासाठी फिटनेस हा माझ्या प्रोफेशनचा भाग आहे. शूटिंग दरम्यान जेव्हा केव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी मेकअप रुममध्ये वर्कआऊटसाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या सहकालारांना देखील वर्कआऊट करण्यासाठी प्रेरित केले आहे, ब-याचदा आम्ही सेटवर एकत्र वर्कआऊट केला आहे.

3. तुमचा रोजचा व्यायाम आणि डाएटचं रुटिन कसं असतं?
मी सहसा, शक्य तेव्हा घरचंच जेवण जेवते. शूटवर असताना रोज माझा घरचा डब्बा असतो... अगदी होममेड. कमी प्रमाणात पण वारंवार म्हणजे दर एक-दोन तासाने खाणे. जागा कोणती आहे याचा फारसा फरक पडू न देता, जेव्हा-केव्हा वर्कआऊटसाठी वेळ मिळतो तेव्हा शरीरासाठी आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी असलेला विशिष्ट असा व्यायाम करणे. असा आहे माझा व्यायाम आणि माझं डाएट रुटिन आणि मुळात वर्कआऊटसाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मनाशी पक्कं केलं की काही अशक्य नसतं.

4. चीट डे विषयी काय सांगाल?
माझ्यासाठी विशिष्ट असा कोणताही चीट डे नाही, मुळात चीट डे नसतोच माझ्यासाठी कारण मी थोड्या फार प्रमाणात सर्व काही खाते. सुदैवाने, गोड पदार्थ खाण्याचं माझं मन नाही करत, स्वीट टूथ मुळीच नाही. हं, पण जेव्हा गोड खावसं वाटतं तेव्हा मी एखादी चॉकलेट पेस्ट्री किंवा आईस्क्रीम आवडीने खाते.

5. सणासुदीच्या दिवसांत ज्यावेळी बरेच गोड पदार्थ बनवले जातात अशा गोड दिवसांत तुम्ही स्वत:ला कसे फिट ठेवता?
आपल्‍या शरीराला हेल्थी ठेवण्‍यासाठी मेटॉबॉलिझम चांगले असणे फार महत्‍त्‍वाचे असते आणि सुदैवाने माझे मेटॉबॉलिझम खूप चांगले आहे. मुळात, माझ्या अगदी लहानपणापासूनच मला डान्सची प्रचंड आवड आहे आणि मी डान्सर असल्यामुळे शरीराला एक प्रकारे व्यायामाची सवय झाली. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी जरा गोड पदार्थ चाखायला, खायला माझी काही हरकत नसते. पण अगोदर म्हटल्याप्रमाणे मला गोड पदार्थांच क्रेव्हिंग होत नाही आणि जर सणासुदीची मिठाई खायची असेल तर मी फक्त त्याची चव चाखण्या इतकंच प्रमाण घेते.

6. फिटनेस प्रिय व्यक्ती म्हणून दिवाळीची तयारी नेमकी कशी असेल?
जरी दिवाळी असली तरी मी माझं वर्कआऊट रुटिन चुकवणार नाही. मी तर म्हणेन, दिवाळीच्या निमित्ताने होणारी घरातली साफसफाई, सजावटीची तयारी हा पण एक व्यायामच आहे. यामुळे मिळालेल्या एक्स्ट्रा फिटनेसच्या संधीमुळे वजन वाढेल याची भिती न बाळगता मी मला हवं ते खाऊ शकते :-)

7. गेल्या वर्षीच्या दिवाळीची एखादी आठवण?
गेल्या वर्षी महामारीमुळे आम्ही सर्वजण घरात अडकलो होतो. कुटुंब आणि मित्रांशी ऑनलाईन जोडले गेलेलो. दिवाळीच्या शुभेच्छा गेल्यावर्षी वरच्युअल होत्या. आनंद होतोय की या वर्षीची दिवाळी ही आनंदाने, उत्साहाने आणि स्वत:ची आणि एकमेकांची सुरक्षा घेऊन साजरी होणार आहे. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीसाठी मी जास्त उत्सुक आहे कारण मी नातेवाईक आणि मित्रांना भेटू शकेन आणि दिवाळी एकत्र साजरी करू शकेन.

तेव्हापासून ते आतापर्यंत मी एकदाही फटाका फोडलेला नाही...

दिवाळीची इंटरेस्टिंग अशी आठवण नाही आहे पण अशी आठवण आहे ज्यामुळे मला अजूनही फटाक्यांची भीती वाटते. आवाज करणारे फटाके मला कधी आवडायचे नाहीत आणि कधी उडवले पण नाही. पाऊस, भुईचक्र, सुरसुरी सारखे शो चे फटाके वापरले आहेत. तर झालं असं होतं की, मी पाचवी/ सहावीत असताना, पाऊस (अनार) लावण्यासाठी त्यावर मी सुरसुरी (फुलजडी) ठेवली होती असताना तो पाऊस (अनार) क्षणात फुटला आणि त्यामध्ये माझा हात जळाला होता. त्यादिवशी भाऊबीज होती, डॉक्टर्स रजेवर होते. बऱ्याच वेदना झाल्या. तेव्हापासून फटाका याविषयी मनात भिती बसली आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत मी एकदाही फटाका फोडलेला नाही. अगदी, आता मला सुरसुरीची (फुलजडी) पण भीती वाटते.

बातम्या आणखी आहेत...