आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी गणेशा:अभिनेता सुबोध भावेच्या घरी विराजमान झाले गणेशा, 'टोकियो ऑलिम्पिक 2020'चा केला देखावा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुबोध भावेच्या घर श्रीगणेशाचे आगमन झाले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात आगमन होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी विराजमान होत आहेत. सामान्यांसह सेलिब्रिटीदेखील बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मराठमोळा अभिनेता सुबोध भावेच्या घरीदेखील श्रीगणेशाचे आगमन झाले आहे.

सुबोध भावेच्या घरी यंदा बाप्पासाठी खास देखावा करण्यात आला आहे. सुबोधच्या घरी यंदा टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतासाठी पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचे कौतुक करणारा देखावा करण्यात आला आहे. सुबोधने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लिहिले, 'गणपती बाप्पा मोरया! बाप्पाच आगमन म्हणजेच आनंद आणि समाधान. या वर्षीचा आमचा देखावा 'टोकियो ऑलिम्पिक 2020" भारता साठी पदक मिळवलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान आणि त्यांचं खूप कौतुक.'

अभिज्ञा भावे, सायली संजीव, पियूष रानडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबाने केलेल्या या देखाव्याचे कौतुक केले आहे.

बातम्या आणखी आहेत...