आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा:अंकिता लोखंडे, सुयश टिळक साजरा करत आहेत लग्नानंतरचा पहिला पाडवा, बघा सेलिब्रिटींनी कसा साजरा केला हा सण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाहुयात सेलिब्रिटींचे खास फोटो -

कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. हा सण घरांघरांत आनंद-उत्साह घेऊन येतो. विजयाचे प्रतिक असलेली गुढी उभारली जाते, आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांची तोरणे दाराची शोभा वाढवतात. नववर्षाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होत पाडव्याचा सण उत्साहात, आनंदात साजरा होतो. सर्वसामान्यांप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीदेखील हा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. कुटुंबाबरोबर हा सण साजरा करत हे सेलिब्रिटी पाडव्याचा गोडवा वाढवत आहेत. यंदा काही सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करत आहेत. अभिनेता सुयश टिळक, अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे. पाहुयात सेलिब्रिटींचे हे खास फोटो -

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा. तिने पती विकी जैनसोबत गुढी उभारत हा सण मोठ्या आनंदात साजरा केला.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनेदेखील चाहत्यांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सुयश टिळकनेसुद्धा पत्नीसोबत पहिला पाडवा साजरा केला आहे.

ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे
ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे
दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांची पत्नी मेघना जाधव
दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांची पत्नी मेघना जाधव
अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि त्यांची मुलगी
अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि त्यांची मुलगी
मिताली आणि सिद्धार्थ यांनी हा खास फोटो शेअर करत चाहत्यांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मिताली आणि सिद्धार्थ यांनी हा खास फोटो शेअर करत चाहत्यांना मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता संकर्षण क-हाडे यानेदेखील चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...