आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग व्हिडिओ आणि फोटोज:साताजन्माच्या गाठीत अडकले शिवानी आणि विराजस, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अडकले लग्नाच्या बेडीत

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा विराजस-शिवानीच्या लग्नाचा व्हिडिओ आणि खास फोटोज...

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता सासूबाई झाल्या आहेत. त्यांचा लेक आणि मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्त गाठत विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत विवाहबद्ध झाला. डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा विवाहसोहळा रंगला.

लग्नासाठी शिवानीने प्रथा सारिजची निवड केली.

1 मे पासून विराजस आणि शिवानी यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली होती. रविवारी शिवानीचा मेंदी सोहळा पार पडला होता.

वर-वधूच्या रुपात विराजस आणि शिवानी अतिशय सुंदर दिसले.

विराजस कुलकर्णी दिग्दर्शित 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात शिवानीने अभिनय केला होता. तिथेच दोघांची ओळख झाली होती. याचवर्षी जानेवारी महिन्यात दोघांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची ऑफिशिअल घोषणा केली होती.

विराजस हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. 'माझा होशील ना' या मालिकेच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. विराजसने 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. विराजस अभिनेत्यासोबत एक लेखक आणि दिग्दर्शकही आहे.

'थेटर ऑन एंटरटेन्मेंट' ही विराजसची निर्मिती संस्था असून त्याने अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. 'अनाथेमा' या नाटकात त्याने अभिनयाबरोबर दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली होती. शिवाय मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

शिवानीदेखील मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिने 'बन मस्का' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

'सांग तू आहेस ना', ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...