आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:मराठी दिग्दर्शकाचा सचिन तेंडुलकरवर निशाणा, म्हणाला - 'तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता!  पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल...'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पॉप स्टार रिहानाने पाठिंबा दिल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांचं समर्थन केले आणि भारत सरकारवर टीका केली. शेतकरी आंदोलनावरुन टीका करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना प्रत्युत्तर म्हणून अनेक भारतीय सेलिब्रिटींनीही ट्विट करण्यास सुरूवात केली. यात टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंचाही समावेश होता. दरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सचिन तेंडुलकरने एक ट्विट करत, भारत काय आहे ते भारतीयच जाणतात आणि भारताचे काय करायचे ते भारतीयच ठरवतील, असे म्हटले आहे. सोबतच यात बाहेरच्यांनी पडू नये, असेही त्याने नमूद केले. ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड होऊच शकत नाही,’ असेही त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. सचिनच्या या ट्विटनंतर मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक समीर विध्वंसने सचिनवर टीका केली आहे.

काय म्हणाला समीर विध्वंस?
सचिनच्या या ट्विटनंतर आनंदी गोपाळ आणि धुरळा यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक समीर विध्वंसनेही परखड प्रतिक्रिया दिली आहे. 'सचिनची बॅटिंग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचं पण वाईट जास्त वाटतंय', असं समीर विध्वंस याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सचिवर टीका केल्यानंतर विध्वंस यांनाही टीकेला सामोरं जावं लागलं आहे. त्यांनाही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं आहे. त्यामुळं समीर यांनी रिप्लायचा पर्याय बंद करणं पसंत केलं आहे.

'मी सभ्य भाषेत माझी मतं मांडतो. सभ्य भाषेतच मांडत राहणार! तरीही त्यावर अर्वाच्य भाषेत अंगावर धाऊन येतात लोक.म्हणून रिप्लाय बंद करावे लागतात. माझ्या मतांशी सहमत नका होऊ, आग्रह नाहीचे. पण सभ्यता का सोडता?! मग अश्यांना ब्लॉक करावं लागतं. आणि ते मी करणार! सभ्यपणे मतमतांतरं असूदेत की', असंही समीरने म्हटलं आहे.

यासोबतच, शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या, आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का? अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी भारत अशाप्रकारे समर्थ आहे का ? असा सवालही त्याने एका ट्विटद्वारे विचारला. "भारताबाहेरच्या लोकांनी ‘आपल्या’ अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही, तुमचं मत. चला ठीक! तुम्हाला सरकारची बाजू पटत्ये. ओके! तरीही ‘आपल्याच’ शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या,बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का?! ‘भारत समर्थ आहे’ असा??!! असा सवाल त्याने विचारला आहे.

बातम्या आणखी आहेत...