आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OTT प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट:लग्नाचा रंगतदार ‘बस्ता’ या दिवशी होतोय झीप्लेक्सवर प्रदर्शित, मुख्य भूमिकेत सायली संजीव

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बस्ता' हा चित्रपट येत्या 29 जानेवारी रोजी झीप्लेक्सवर प्रदर्शित होतोय.

लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार ‘बस्ता’ चित्रपटाच्या माध्यमातून 29 जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. हा चित्रपट येत्या 29 जानेवारी रोजी झीप्लेक्सवर प्रदर्शित होतोय. चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव हिने प्रमुख भूमिका साकारली आहे.

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात सायली संजीवसह अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे. मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे.

या निमित्ताने दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाले, "बस्ता हा एका शेतकरी वडील माणसाचा एक अतिशय भावनिक प्रवास आहे ज्याला आपल्या मुलीचे सुखाने लग्न झालेले पहायचे आहे. त्यात आनंदाचे आणि हळवे क्षण आहेत. प्रत्येक पात्राला सुंदर भावनात्मक ग्राफ लाभलाय. मला झीप्लेक्ससारखा प्लॅटफॉर्म मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा उत्तम मार्ग आहे."

बातम्या आणखी आहेत...