आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी.. गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव.. दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’!... 'दगडी चाळ 2' हा चित्रपटातून डॅडींचा प्रवास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येणार आहे. नुकताच सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर रिलीज केला गेला आहे.
तुफान कोसळणारा पाऊस आणि लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे डॅडी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एंट्री लक्ष वेधून घेणारी आहे. ही इज बॅक... म्हणत चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 2015 मध्ये दगडी चाळ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यात मकरंद देशपांडे यांच्यासह अंकुश चौधरी आणि पूजा सावंत मेन लीडमध्ये झळकले होते. आता त्याचा सिक्वेल येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत कणसे यांनी सांभाळली आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर संगीता अहिर यांनी दगडी चाळच्या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले होते. पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता चित्रपटाचा सिक्वेल त्या घेऊन येत आहेत. सिक्वेलमध्ये मकरंद देशपांडे यांच्यासह पूजा सावंत, अंकुश चौधरी, संजय खापरे, यतिन कार्येकर, कमलेश सावंत झळकणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.