आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:मराठीतील गाजलेल्या 'फत्तेशिकस्त' चित्रपटाचे संकलन करणारे प्रमोद कहार यांचे निधन, कोरोनामुळे मालवली प्राणज्योत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रमोद कहार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध एडिटर म्हणून ओळखले जात होते.

मराठी चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी आली आहे. दिगपाल लांजेवार दिग्दर्शित मराठीतील गाजलेला चित्रपट 'फत्तेशिकस्त'चे संकलन करणारे प्रमोद कहार यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रमोद कहार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध एडिटर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोनिश पवार दिग्दर्शित 'धोंडी' या चित्रपटासह 'फर्जंद' या चित्रपटासाठी एडिटर म्हणून भूमिका बजावली होती. आगामी 'पावनखिंड' या चित्रपटासाठीदेखील ते काम करत होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...