आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला मराठी पॅन इंडिया चित्रपट:पाच भाषांमध्ये घुमणार 'हर हर महादेव' ही शिवगर्जना!, अमृता खानविलकरने शेअर केला टीझर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 400 हुन अधिक तंत्रज्ञ या चित्रपटावर काम करत आहेत.

पावनखिंड, फत्तेशिकस्त, फर्जंड, हंबीरराव मोहिते हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता या चित्रपटांच्या यादीत आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची भर पडतेय. हर हर महादेव हे आगामी चित्रपटाचे नाव असून तब्बल पाच भाषांमध्ये ही शिवगर्जना ऐकायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य त्यांची थोरवी याचे आकर्षण, कुतूहल आजही अनेकांच्या चर्चेचा, अभ्यासाचा विषय असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर भारतीय भाषिकही महाराजांच्या कार्यावर संशोधन करतात. महाराजांचा हाच महिमा भव्य दिव्य स्वरूपात झी स्टुडिओज घेऊन येत आहेत.

'हर हर महादेव' हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये एकाच दिवशी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा मराठीतील पहिला पॅन इंडिया चित्रपट ठरणार आहे. अभिजित देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट दिवाळीमध्ये सर्वांच्या भेटीस येणार आहे. झी स्टुडिओजच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवरुन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अलीकडेच 'चंद्रमुखी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील चित्रपटाचा टीझर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. यावरुन या चित्रपटात अमृता एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. पण चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार याचा उलगडा अद्याप करण्यात आलेला नाही. अमृताने चित्रपटाचा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, "झी स्टुडीओज् अभिमानाने सादर करीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण अक्षरांत लिहीलेली एक अजरामर शौर्यगाथा.. मराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही बुलंद शिवगर्जना होणार तब्बल पाच भारतीय भाषांमध्ये… येत्या दिवाळीत सादर करीत आहोत ‘हर हर महादेव’ मोठ्या पडद्यावर."

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिएफएक्स टीम. अनेक हॉलिवूडपटांवर काम करणारे व्हिएफएक्स तंत्रज्ञ यावर काम करत असून तब्बल 400 हुन अधिक तंत्रज्ञांचा यात समावेश आहे." सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांचं आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्व प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

बातम्या आणखी आहेत...