आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीझर रिलीज:नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अभूतपूर्व पराक्रमाची शौर्यगाथा... 'जंगजौहर'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 जुलैला, सोमवारी या चित्रपटाची पहिली झलक टीझर रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

13 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा...  मराठे शाहीच्या इतिहासातील रक्तरंजित अध्याय याच दिवशी घोडखिंडीत लिहिला गेला. अतुलनीय शौर्याचा आणि अजोड स्वामीनिष्ठेचा हा ठसठशीत वस्तूपाठ जगासमोर साकारला गेला. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटाच्या रुपात लवकरच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करताना सांगतात, "13 जुलै 1660... 360 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पावनखिंडीमध्ये वीरांचा रणआक्रोश गुंजला होता... स्वराज्य वाचवण्यासाठी.... आपला लाडका राजा सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठी माणसं हाडामांसाची तटबंदी उभारू शकतात हे आमच्या पूर्वजांनी जगाला दाखवून दिलं होतं.... पावनखिंड.. हीच ती जागा जिथे "तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला" असं म्हणत एका काळभैरवानं बाजीप्रभूंच्या रूपानं प्रलयंकर तांडव केलं होतं. रायाजी बांदल, फुलाजीप्रभू आणि बांदल सेनेतल्या ३०० शिवगणांनी पराक्रमाचं विराट रूप दर्शन घडवलं होतं. या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा पावन दिवस. या दिवशी या वीरांच्या उपकारांनी उपकृत होऊन त्यांना कलारूपी श्रद्धांजली देण्याचे भाग्य मिळवीत आहोत आणि शिवछत्रपती, जिजाऊसाहेब, आदिशक्ती तुळजाभवानी आणि अवघ्या महाराष्ट्राच्या चरणी जंगजौहर या चित्रपटाचा टिझर अर्पण करीत आहोत. जय भवानी..जय शिवराय.. हर हर महादेव..

"असंल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी स्वराज्यासाठी वार झेलू निधड्या छातीवरती !!"

स्वराज्याच्या इतिहासातल्या दैदीप्यमान त्याग आणि बलिदान पर्वाची ही झलक, महाराष्ट्रचरणी अर्पित करीत आहोत 'जंगजौहर'चा टीझर..." 

View this post on Instagram

१३ जुलै १६६०... ३६० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पावनखिंडीमध्ये वीरांचा रणआक्रोश गुंजला होता... स्वराज्य वाचवण्यासाठी.... आपला लाडका राजा सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठी माणसं हाडामांसाची तटबंदी उभारू शकतात हे आमच्या पूर्वजांनी जगाला दाखवून दिलं होतं.... पावनखिंड.. हीच ती जागा जिथे "तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला" असं म्हणत एका काळभैरवानं बाजीप्रभूंच्या रूपानं प्रलयंकर तांडव केलं होतं. रायाजी बांदल, फुलाजीप्रभू आणि बांदल सेनेतल्या ३०० शिवगणांनी पराक्रमाचं विराट रूप दर्शन घडवलं होतं. या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा पावन दिवस. या दिवशी या वीरांच्या उपकारांनी उपकृत होऊन त्यांना कलारूपी श्रद्धांजली देण्याचे भाग्य मिळवीत आहोत आणि शिवछत्रपती, जिजाऊसाहेब, आदिशक्ती तुळजाभवानी आणि अवघ्या महाराष्ट्राच्या चरणी जंगजौहर या चित्रपटाचा टिझर अर्पण करीत आहोत. जय भवानी..जय शिवराय.. हर हर महादेव.. "असंल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी स्वराज्यासाठी वार झेलू निधड्या छातीवरती !!" स्वराज्याच्या इतिहासातल्या दैदीप्यमान त्याग आणि बलिदान पर्वाची ही झलक, महाराष्ट्रचरणी अर्पित करीत आहोत 'जंगजौहर'चा टीझर... #जंगजौहर #JungJauhar #JungJauharTeaser #AAFilms In Association with @almondscreations Written and Directed By : @digpalofficial Produced By : @ajayarekarofficial #AniruddhaArekar

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial) on Jul 12, 2020 at 8:31pm PDT

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ अशा शिवचरित्रावर आधारीत यशस्वी चित्रपटांच्या मालिकेतील पुढचं सुवर्णपान युवा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापुढे उलगडणार आहेत. अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांच्यासह सुमारे 21 कलाकारांची भली मोठी मांदियाळी दिसणार आहे.