आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये पोस्टर रिलीज:‘लॉ ऑफ लव्ह’चे पोस्टर प्रदर्शित, निर्माते म्हणाले - प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटातील कलाकारांची नावे अद्यापतरी जाहीर झाली नाहीत.

लॉकडाऊनचा परिणाम चित्रपटसृष्टीवरदेखील झाला आहे. वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवण्यात आले आहे. चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे नव्या चित्रपटांचे प्रदर्शन तसेच नव्या चित्रपटांचे प्रमोशन रखडले आहेत. या दरम्यान एका सकारात्मक दृष्टिकोनातून निर्माता आणि पटकथाकार जे. उदय प्रेक्षकांसाठी “लॉ ऑफ लव्ह” हा नवीन मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. 

'लॉ ऑफ लव्ह' या चित्रपटाचे पोस्टर 18 मे रोजी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटातील कलाकारांची नावे अद्यापतरी जाहीर झाली नाहीत. चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांचा हा पहिला चित्रपट आहे.

चित्रपटाचं नाव जितकं हटके आहे तितक्याच हटके त्याची कहाणी असेल यात काहीच शंका नाही. चित्रपटाचे निर्माता आणि पटकथाकार जे. उदय यांचा हा पहिला सिनेमा आहे. लॉकडाऊननंतर सुरु होणाऱ्या प्रेक्षकांच्या बदललेल्या आयुष्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्याय ठरणार आहे. 

निर्माते  जे. उदय म्हणाले,  "प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, सध्याची परिस्थिती पूर्णपणे जाणता खास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या लोकांसाठी नवं काहीतरी देण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही फर्स्ट लूक पोस्टरचं अनावरण केलं आहे. लॉकडाऊन च्या काळात उत्सुकता वाढविणे आणि सर्व सुरळीत चालू झाल्यावर प्रेक्षकांना लार्जर दॅन लाईफ अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे."  

बातम्या आणखी आहेत...