आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू नॉर्मल:चित्रपटगृहात पुन्हा झळकणार 'नटसम्राट', या तारखेला होणार प्रदर्शित

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट उद्या (27 नोव्हेंबर) पासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे.

काही कलाकृती या कालातीत असतात. या कलाकृतींचा कितीही आस्वाद घेतला तरी रंजनाची भूक शमत नाही. अशा कलाकृतींच्या यादीतील 'नटसम्राट' या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे. मराठी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांची मने जिंकणारा हा चित्रपट उद्या (27 नोव्हेंबर) पासून पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे.

कोरोनामुळे गेले कित्येक महिने बंद असलेली चित्रपटगृहे अनलॉकअंतर्गत पुन्हा सुरु झाली आहेत. पुन्हा एकदा चित्रपटांचे दिमाखदार पोस्टर चित्रपटगृहांबाहेर झळकताना दिसू लागले आहेत. हळूहळू का होईना प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळताहेत. अशावेळी या रसिकप्रिय चित्रपटांचे प्रदर्शन म्हणजे सिंगल स्क्रीन व मल्टिप्लेक्स यांना नवचैतन्य देण्याचा प्रयत्न ठरणार आहे.

खाली दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकणार आहे.

1 जानेवारी 2016 रोजी हा चित्रपट पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 35 वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र आले होते. नटसम्राट गणपतराव रामचंद्र बेलवलकर ऊर्फ अप्पासाहेब बेलवलकरांची ही कथा. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटातही वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते नाना पाटेकरांनी यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विश्वास जोशी, नाना पाटेकर आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी निर्मिती केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser