आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेड' चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज:'बेसुरी' गाण्यात शाळकरी मुलांच्या रुपात दिसले जिनिलीया-रितेश, अजय-अतुलचे संगीत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. IMDB या साईटवर मोस्ट अँटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर हा चित्रपट ट्रेंड होत आहे. नुकतेच या चित्रपटातील पहिले गीत 'वेड तुझा' प्रदर्शित झाले होते. त्या गाण्याला अल्पावधित प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता 'वेड'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील 'बेसुरी' हे गाणे आज प्रदर्शित केले आहे. हे गाणे वसुंधरा. वी यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने देश म्यूजिकलेबल द्वारे हे गाणे रिलीज केले आहे.

'बेसुरी' या गाण्यात रितेश आणि जिनिलीया देशमुख शाळकरी मुलांच्या रुपात दिसत आहेत. रितेशच्या पात्रावर एकतर्फी प्रेम असलेल्या तरुणीची व्यक्तिरेखेत जिनिलिया दिसतेय. विशेष म्हणजे या चित्रपटातून जिनिलीया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. तर रितेश देशमुखने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात जिनिलीया आणि रितेशसह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पाहा गाण्याचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...