आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवारी मुंबईत मराठी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मराठी स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, पूजा सावंत, मानसी नाईक, मैथिली पालकर, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे या तारकांसह मराठीतील अभिनेत्यांनीही स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिची खास हजेरी या पुरस्कार सोहळ्याला होती.
या पुरस्कार सोहळ्यात अनेक मराठी चित्रपटांनी, कलाकारांनी विविध विभागांसाठी पुरस्कार जिंकले. या सोहळ्याचं सूत्रसंचालन अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव यांनी केले
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान बॉलिवूड अभिनेता दिपक डोब्रियाल याला मिळाला. संजय दत्तच्या ‘बाबा’ या चित्रपटाद्वारे दिपक डोब्रियालने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि याच चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याच्या वतीने त्याच्या पत्नीने हा पुरस्कार स्वीकारला. तर ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.
या पुरस्कार सोहळ्यात दबदबा राहिला तो ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाचा. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान पटकावला. तर याच चित्रपटासाठी अभिनेता ललित प्रभाकरला सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) आणि भाग्यश्री मिलिंद हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) पुरस्काराने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) हा पुरस्कार भाग्यश्री मिलिंद हिच्यासह 'हिरकणी' चित्रपटासाठी सोनाली कुलकर्णी हिला विभागून देण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी महेश कोठारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.