आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी वाजत गाजत गणरायाचे आगमन होणार आहे. यंदा गणेशोत्सवाला कोणतेही निर्बंध नसतील. त्यामुळे सगळेच मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. यात मराठी कलाकारही मागे नाहीत. जशी आगमनाची तयारी केली जाते. तशीच बाप्पाला निरोप देताना वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते. मराठी कलाकारदेखील दरवर्षी बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देत असतात. त्यासाठी काही मराठी कलाकारांनी एकत्र येत 2014 मध्ये एकत्र येत कलावंत ढोल ताशा पथक या नावाने एका ढोल पथकाची स्थापना केली. हे सर्व मराठी कलाकार एकत्र येत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. यातून मिळणा-या देणगीचा उपयोग हे कलाकार सामाजिक कार्यासाठी करत असतात.
मध्यंतरी दोन वर्षे कोरोनामुळे गणपती विसर्जनाची मिरवणूक निघू शकली नाही. मात्र यंदा हे पथक कामाला लागाले आहे. कलाकारांची रंगीत तालीम सुरु झाली आहे.
अजय पुरकर, आस्ताद काळे, सौरभ गोखले, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, प्रसाद ओक, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे ही कलाकार मंडळी या पथकात आहेत. हे सर्व कलाकार मिरवणुकींमध्ये बेभान होऊन ढोल-ताशांचा गजर करत असतात.
विशेष म्हणजे रंगीत तालीममध्ये यंदा अभिनेता सिद्धार्थ जाधवसुद्धा सहभागी झाला होता.
यंदाच्या गणपती मिरवणुकीत या कलाकारांना ढोल ताशा मिरवणुकीत बेभान होऊन ढोल ताशांचा गजर करताना बघणे नक्कीच चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार हे काही वेगळे सांगायला नको.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.