आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनाऊंसमेंट:'चोरीचा मामला' आता मल्याळम, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये, 'चोरीचा मामला 2' चीदेखील तयारी सुरू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

याचवर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित "चोरीचा मामला" या चित्रपटाच्या नावावर आता नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. मल्याळम, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये या भाषांमध्ये चित्रपटाची निर्मिती होणार असून, पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर प्रियदर्शन जाधवने "चोरीचा मामला"च्या सर्व मुख्य कलाकारांचा एक फोटो शेअर केला आहे, 'चोरीचा मामला 2 ची तयारी सुरू', असे कॅप्शन त्याला दिले आहे. त्यामुळे "चोरीचा मामला 2" मध्ये हे सर्व कलाकार दिसतील याची खात्री झाली असून त्यांच्यासोबत नवीन कोण कलाकार दिसणार का याची मात्र अजून उत्सुकता आहे.

स्वरुप स्टुडिओज निर्मित एवरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत सुधाकर ओमाळे,आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार,स्मिता ओमाळे यांनी "चोरीचा मामला" या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट होती.

एक प्रामाणिक चोर एका बंगल्यात चोरी करायला गेल्यावर कसा अडकत जातो याची धमाल गोष्ट या चित्रपटात होती. गुंतवणून ठेवणारी पटकथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या चित्रपटानं प्रेक्षकांची दाद मिळवली. आता मराठीची सीमा ओलांडून पाच वेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट तयार होणार आहे.