आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पहिल्या पावसाच्या सरी अलगद अंगावर आल्या की प्रत्येक जण सुखावून जातो. अनेक लहान मुलांच्या ओठी ‘येरे येरे पावसा,तुला देतो पैसा’ हे बालगीतही ऐकू येतं. पावसाची अनेक रुपं आहेत. कधी तो लहान मुलांच्या होड्या वाहून नेणारा खोडकर असतो, तर कधी गडगडाट करुन प्रत्येकाला घाबरवून सोडणारा बेताल असतो. त्यामुळे प्रत्येकासाठी पावसाची संकल्पना वेगवगेळी आहे. याच पावसावर आधारित ‘येरे येरे पावसा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याच्यावर पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला आहे.
‘हॉलिवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स 2020’ (HNFA) या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, पटकथा, सहाय्यक अभिनेता, संकलन आणि साउंड डिझायनिंग या विभागासाठी या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत. ‘हॉलिवूड नॉर्थ फिल्म अवॉर्ड्स 2020’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘येरे येरे पावसा’ला 13 नामांकने मिळाली होती. त्यापैकी या चित्रपटाने तब्बल 6 पुरस्कार पटकावत बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
दरम्यान, पावसाची धमाल आणि लहानांची कमाल दाखवणारा हा चित्रपट नकळत एक मोलाचा संदेश देऊन जातो. पावसाचं आगमन जसं प्रत्येकाला सुखावणार असतं तसा हा चित्रपटही प्रत्येकाच्या मनाला एक वेगळी उभारी देणारा असेल असा विश्वास दिग्दर्शिका शफक खान यांनी व्यक्त केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.