आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म:मराठी प्रेक्षकांना लवकरच ओटीटीच्या रुपात सरप्राईज, ‘लेट्सफ्लिक्स’ लवकरच येतंय भेटीला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता मराठी प्रेक्षकांना लवकरच ओटीटीच्या रुपात एक सरप्राईज मिळणार आहे.

गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन 2020 मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे अधिकाधिक वाढू लागला आहे. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सीरिज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. आता मराठी प्रेक्षकांना लवकरच ओटीटीच्या रुपात एक सरप्राईज मिळणार आहे.

प्ले स्टोअरवर नऊ लाखांहून अधिक पसंती मिळालेल्या ‘लेटसअप’ या इन्फोटेनमेंट व न्यूज अॅपच्या प्रचंड यशानंतर सुप्रसिद्ध उद्योजक, ‘अहमदनगर महाकरंडक’ समितीचे अध्यक्ष, निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि स्टार्टअप स्टुडियो फाऊंडर/ संस्थापक राहुल नार्वेकर त्यांच्या ‘लेट्सफ्लिक्स’ या नव्या मराठी ओटोटीच्या निमित्ताने OTT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच ‘लेटसअप’ या अ‍ॅपला AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge अंतर्गत 'आत्मनिर्भर अ‍ॅप पुरस्कार' मिळाला. ओटीटीसाठी असलेली पसंती लक्षात घेता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी देखील त्यांच्या हक्काचं ओटीटी माध्यम मराठीमध्ये घेऊन येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर आणि सिनेइंडस्ट्री यांचं नातं फार जुनं आहे. नरेंद्र फिरोदिया हे ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ यांसारखे अनेक प्रोजेक्ट्सचे प्रमुख आहेत.‘अहमदनगर महाकरंडक’ या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेचे ते अध्यक्ष आणि प्रायोजक देखील आहेत. ‘अगंबाई अरेच्चा 2’ आणि ‘ट्रिपल सीट’ या मराठी सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे.

राहुल नार्वेकर यांनी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला अनुराग कश्यप आणि विजय मौर्या यांसारख्या नामांकित सिनेनिर्मात्यांसह पटकथा लेखक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्समध्ये सीईओ म्हणून काम सांभाळले. ‘इंडिया नेटवर्क’ आणि ‘स्टार्टअप स्टुडिओ’चे ते संस्थापक आहेत.

स्वतंत्र ओटीटी सुरु करणे हे आव्हानात्मक तर आहेच पण या माध्यमातून मराठी प्रतिभेसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असं मत नरेंद्र फिरोदिया यांनी मांडलं. “कोणतीही नवीन गोष्ट सुरु केली की आव्हानं असतातच, कारण ती तुमची नवीन सुरुवात असते. तसेच ‘लेट्सफ्लिक्स’चं देखील आहे. पण आमच्या ओटीटीला उत्तम टीम लाभली आहे त्यामुळे आम्हांला आशा आहे की आम्ही सर्व आव्हानं नक्की पूर्ण करु आणि प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करु. ज्यांना सिनेमा, वेब सीरिज, शॉर्ट फिल्म बनवायची आहे किंवा तयार आहे पण प्रदर्शित कुठे करायची याचा विचार करत आहेत किंवा ज्यांच्याकडे कॉन्टेंट आहे अशा टॅलेंटसाठी ‘लेट्सफ्लिक्स’ हा प्लॅटफॉर्म असेल”, असं ते पुढे म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser