आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोटा पडदा:नव्या वर्षात अरुंधती करणार आयुष्याची नव्याने सुरुवात, ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरुंधती नवीन वर्षात तिच्या आयुष्याची नव्याने कशी सुरुवात करते हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्धकडून फसवणूक झाल्यानंतर खचून न जाता अरुंधती स्वयंपूर्ण झाली आणि कठीण प्रसंगात तिने स्वत:ला आणि संपूर्ण कुटुंबाला सावरलं. एरव्ही अरुंधतीचा वाढदिवस कुणाच्या लक्षात रहात नसे. पण यंदा मात्र यश आणि गौरीने मिळून अरुंधतीच्या वाढदिवसाचं दिमाखदार सेलिब्रेशन करायचं ठरवलं आहे. त्यासाठी जोरदार प्लॅनिंगही सुरु झालं आहे.

अरुंधतीच्या वाढदिवसाचं अनिरुद्धलाही निमंत्रण असणार आहे. वाढदिवसाच्या दिवशीच अरुंधती एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. हा निर्णय नेमका काय असणार? या निर्णयाचे संपूर्ण कुटुंबावर कसे पडसाद उमटणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...