आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सई करणार आर्यावर पहिला वार!:सईचा डाव आर्याच्या जिवावर बेतेल का? , 'आई माझी काळुबाई'मालिकेला नवीन वळण

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आई माझी काळुबाई'चा 'महाएपिसोड' 28 फेब्रुवारी, संध्या. सात वाजता प्रसारित होणार आहे.

छोट्या पडद्यावरची 'आई माझी काळुबाई' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे.

मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.

28 फेब्रुवारीला संध्या. सात वाजता 'आई माझी काळुबाई'चा महाएपिसोड असणार आहे. हंबीररावांचा खून ज्या नोकराकरवी विराटनं करवला होता त्या नोकराचा आर्या शोध घेतेय. दरम्यान सई लाख्यासुराची शिष्या झाली आहे आणि तिला काही दिव्य शक्ती मिळाल्या आहेत. तिला मिळालेल्या या शक्तींचा उपयोग करून ती आर्याला हरवण्याचा प्रयत्न करतेय.

हंबीरवांच्या खुन्यापर्यंत आर्या पोचू शकेल का? सईचा डाव आर्याच्या जिवावर बेतेल का? चांगल्या शक्तीविरुद्ध वाईट शक्ती अशी लढाई प्रेक्षकांना 'आई माझी काळुबाई' या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...