आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलिब्रेशन:'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' मालिकेने गाठला 350 भागांचा टप्पा, सेटवर केक कापून साजरा झाला आनंद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकतंच या मालिकेच्या 350 व्या भागाचं प्रक्षेपण झालं आणि हा आनंद कलाकारांनी सेटवर साजरा केला.

झी युवावरची 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. या मालिकेमधल्या नचिकेत, सई आणि अप्पा केतकर या तीन व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी त्यांच्या मनात कायमची जागाही दिली. सई आणि नचिकेत यांच्या प्रेमामधली लपवाछपवी पाहताना प्रेक्षकांनाही मजा येतेय, त्यात अप्पांची लुडबूड या मजेमध्ये भरच पाडतेय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मालिकेला मिळणारा चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद. पाहता पाहता या मालिकेने 350 भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.

या मालिकेतील सई आणि नचिकेत म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता नचिकेत दामले या आनंदाच्या क्षणी म्हणाले, "ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेचा 350 वा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. आम्ही असंच प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहू. सध्या प्रेक्षक मालिकेत सईची नचिकेतवर होणारी चिडचिड पाहत आहेत आणि ती चिडचिड कोणामुळे होतेय हे प्रेक्षकांना जरी ठाऊक असलं तरी आम्हाला ते मालिकेत कुठल्या टप्प्यावर कळेल ते प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं अविरत प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने हा यशस्वी टप्पा गाठला. प्रेक्षकांनी आजवर या मालिकेला जो प्रतिसाद दिला असाच पुढेही ते राहतील याची आम्हाला खात्री आहे."

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser