आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण:15 ऑगस्टला नचिकेतला मिळणार अप्पांच्या तिरस्कारापासून स्वातंत्र!

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेत 15 ऑगस्टच्या निमित्ताने देशभक्तीवर बोलण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

'ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण' या मालिकेमध्ये लवकरच स्वातंत्र दिवस खास भाग दाखवला जाणार आहे. ज्यात पुन्हा एकदा अप्पा आणि नचिकेत एकमेकांसमोर उभे ठाकणारेत. 15 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. टेलिव्हिजन मालिकाही याला अपवाद नाहीयेत.

'ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण'मध्ये 15 ऑगस्टच्या निमित्ताने देशभक्तीवर बोलण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ज्यात नचिकेत त्याच्या देशभक्तिबद्दलच्या भावना एका संस्कृत सुभाषितामधून व्यक्त करतो, ज्याने अप्पा मात्र अजिबातच इम्प्रेस होत नाही. उलट इंटरनेटवर असे शंभर सुभाषितं सहज उपलब्ध होतात असा टोमणा ते नचिकेतला मारतात.

याचदरम्यान अप्पांना व्याख्यानाचे आमंत्रण येते पण कोरोनामुळे व्याख्यान कुठे करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असताना नचिकेत पुन्हा एकदा त्यांच्या मदतीला धावून येतो. अप्पा नचिकेतच्या घरी व्याख्यानाचा कार्यक्रम करतात. आता या व्याख्यानादरम्यान काय काय घडतं ते मात्र 'ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण'च्या आगामी भागात पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...