आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लगीनघाई:'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण'मध्ये अप्पा आणि आजी पुन्हा एकदा चढणार बोहल्यावर, थाटात साजरा होणार लग्नाचा 50 वा वाढदिवस

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सई पहिल्यांदा नचिकेतवरच्या तिच्या प्रेमाची कबुली देणार आहे.

झी युवा वरच्या 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकेत सध्या प्रेक्षक लगीनघाई पाहत आहेत. पण हे लग्न नचिकेत आणि सईच नसून अप्पा आणि आजींचं आहे. हो, अप्पा आणि आजींच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत आणि हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी पुन्हा एकदा अप्पा आणि आजींच्या लग्नाचा नचिकेतने घाट घातला आहे. त्यामुळे आता मालिकेत प्रेक्षकांना लग्नाच्या सर्व विधी, रीती आणि कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

परंपरेनुसार लग्नाआधी नवऱ्या मुलाने नवरीला पाहायचे नसते म्हणून आजी लग्नाच्या आदल्या दिवशी माहेरपणाला नचिकेतच्या घरी राहायला जाणार आहेत. तिथेच आजींची हळद, मेहंदी पार पडणार आहे. त्यानंतर अप्पा आणि आजींचा पारंपरिक विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सगळ्यात सई आणि नचिकेतच नातं देखील अजून खुलताना प्रेक्षकांना पाहू शकतील कारण सई पहिल्यांदा नचिकेतवरच्या तिच्या प्रेमाची कबुली आय लव्ह यु म्हणून देणार आहे.

आता ती नचिकेतला कशा प्रकारे आय लव्ह यु म्हणणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. त्यामुळे अप्पा आणि आजींच्या लग्नाच्या नक्की यायचं.