आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेटेस्ट ट्रॅक:स्वाती आणि श्रीधरची जुळणार रेशीमगाठ! 'चंद्र आहे साक्षीला'मध्ये कसा असेल यांचा लग्नानंतरचा प्रवास

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दोघांच्या लग्नाला मिना आत्याचा पुर्णपणे विरोध आहे.

ते म्हणतात ना, ‘फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं’... स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं... दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं... यामध्ये बर्‍याचदा स्वातीला नन्ना सांगतो की श्रीधर काही चांगला माणूस वाटत नाही... श्रीधरच्या तोतया बायकोला भेटल्यावर देखील स्वाती श्रीधरचं खरं रूप ओळखू शकत नाही. स्वाती उघड्या डोळ्याने देखील सत्य बघू शकत नाहीये. कारण तिच्या डोळ्यावर श्रीधरच्या प्रेमाची पट्टी आहे. स्वातीसमोर स्वतःला प्रामाणिक म्हणून सिद्ध करण्यासाठी श्रीधरने अनेक नवनवे डाव रचले. आणि त्यात स्वाती पूर्णत: अडकत चालली आहे. श्रीधर आणि स्वातीच्या जुळू पाहणाऱ्या नात्यात अनेक संकट येत राहिली पण श्रीधरने प्रयत्न सोडला नाही.

श्रीधरच्या प्रेमात जसजसे दिवस पुढे सरकू लागले स्वातीचा त्याच्यावरचा विश्वासदेखील वाढू लागला. श्रीधरने स्वातीसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा विचार देखील केला आहे. त्याने रचलेल्या या जाळ्यात स्वाती पुरेपूर अडकली देखील जाणार आहे. आणि अखेर ती लग्नास होकार देखील देणार आहे. स्वाती आणि श्रीधरची अखेर रेशीमगाठ जुळणार आहे. आता हे कसे घडले ? श्रीधरने कसे स्वातीला मनवले ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे. या दोघांच्या लग्नाला मिना आत्याचा पुर्णपणे विरोध आहे. त्यामुळे अचानक तिथे मिना आत्याच्या येण्याने काय होईल ? तिच्या येण्याने श्रीधर आणि स्वातीच्या नात्याला गालबोट तर लागणार नाही ना ? श्रीधरचा खरा चेहरा ती स्वातीसमोर आणू शकेल ? मिनाआत्या तिथे कशी पोहचली ? हे मालिकेच्या येणा-या भागांमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...