आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिवर्ल्ड अपडेट:‘देवमाणूस’ मालिकेत देवी सिंगचा होणार पर्दाफाश, एसीपी दिव्याच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्याचा अजितला गाफील ठेऊन अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचा प्लॅन..

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील सरू आज्जी, डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहेत.

आता ही मालिका एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे. देवी सिंगला शोधण्यासाठी ACP दिव्या साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरतेय. दिव्या हुशारीने अजितचे फिंगरप्रिंट्स मिळवते. रेश्माच्या घरातल्या तिसऱ्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटसोबत अजितचे फिंगरप्रिंट मॅच होतात त्यामुळे दिव्या द्विधा मनस्थितीत आहे. पण आता दिव्याला प्रत्येक केसमध्ये असलेल्या व्यक्ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अजितच्या संपर्कात आल्याचं लक्षात येतं.

त्यामुळे आता ACP दिव्या डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंगला कधी अटक करणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय.

बातम्या आणखी आहेत...