आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुभेच्छा:‘डॉक्टर डॉन’ मालिकेने गाठला 200 भागांचा टप्पा, अभिनेता देवदत्त नागे म्हणाला...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेटवर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांच्या ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेनेे 200 भागांचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने हा यशस्वी माइलस्टोन गाठला, असे मालिकेचा प्रमुख अभिनेता देवदत्त नागे म्हणाला. सेटवर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

या आनंदाच्या क्षणी देवा म्हणजे अभिनेता देवदत्त नागे म्हणाला, “डॉक्टर डॉन या मालिकेला जवळपास 1 वर्ष पूर्ण झालंय आणि मालिकेने 200 भागांचा टप्पा देखील गाठला. हे सगळं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आणि प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो. प्रेक्षक वेळात वेळ काढून आम्हाला रोज टीव्ही स्क्रीनवर बघतात आणि आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही कलाकार टीव्हीवर दिसतो पण प्रत्येक भाग तुमच्यासमोर सादर करण्यासाठी पडद्यामागे खूप मोठी टीम कार्यरत आहे या संपूर्ण टीमचे देखील मी अभिनंदन करतो. प्रेक्षक या पुढेही आमच्यावर असाच प्रेम करत राहतील याची मला खात्री आहे.”

बातम्या आणखी आहेत...