आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अपडेट:देवा आणि डॉ मोनिकाच्या प्रेमाला होतोय आक्काचा विरोध, 'डॉक्टर डॉन' मालिकेला इंट्रेस्टिंग वळण

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवाच्या घरची माणसं त्याच्या प्रेमात आडकाठी घालत आहेत.

झी युवावरची 'डॉक्टर डॉन' ही मालिका आणि तिची वाढत जाणारी प्रेक्षक संख्या पाहिली तर सध्या देवा आणि डॉ मोनिका यांचा लव्हट्रॅक चांगलाच पसंत केला जातोय हे समजेल. आता दोन व्यक्तींमधलं प्रेम म्हंटलं की त्यात उतार चढाव आलेच, रुसवे फुगवेही आले शिवाय आपल्याच लोकांची नाराजी किंवा त्यांचे हेवेदावेही आलेच.

'डॉक्टर डॉन'मध्ये सध्या याच प्रेमाची परिक्षा पाहिली जातेय. एकीकडे देवाच्या आक्काचा त्याच्या प्रेमाला म्हणजे डॉ मोनिकाला साफ विरोध आहे तर दुसरीकडे देवाची मुलगी राधाही त्याच्या या प्रेमात आडकाठी घालू पहातेय. देवा डॉ मोनिकाला लग्नाची मागणी घालण्याच्या तयारीमध्ये असतानाच त्याच्याच घरची माणसं अशापद्धतीने आडकाठी घालू पहातायत.

आक्का आणि राधा या दोघींमुळे देवा मात्र चांगलाच कचाट्यामध्ये सापडलाय. आक्काने तर डॉलीला घरामध्ये अजिबात प्रवेश नसल्याचं सांगत सक्त ताकीदही दिलीये. तिने डॉलीला कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास द्यायला सुरुवातही केलीये. पण डॉली म्हणजेच डॉ मोनिका या सगळयामध्ये खंबीर उभी आहे. आक्काचा नकार होकारामध्ये बदलून दाखवेन असा विश्वास डॉलीबाईंना आहे आणि त्यासाठी लागेल ती मेहनत करायची तयारीही तिने देवाला दाखवलीये.

देवा आणि डॉ मोनिका यांच्या या प्रेमाच्या वाटेवर आता आणखी कोणकोणते अडथळे तयार होणार हे आता पहात रहाणं उत्सुकतेचं असेल.

बातम्या आणखी आहेत...