आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साल्सा स्पेशल एपिसोड:डॉक्टर डॉन आणि डॉलीबाईंनी केला साल्सा, निमित्त आहे देवाच्या लाडक्या डॉलीबाई म्हणजेच डॉ मोनिका यांचा वाढदिवस

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉलीबाईंच्या वाढदिवसानिमित्त देवाने खास पार्टी ठेवली आहे.

झी युवा वाहिनीवरच्या डॉक्टर डॉन या मालिकेमध्ये सध्या देवा आणि डॉलीबाई यांच्या प्रेमाचे जोरदार वारे वाहतायत. देवा आणि डॉ मोनिका यांच्या नव्याने सुरु झालेल्या या प्रेमाची कहाणी सध्या भेटीगाठी, विविध सरप्राईजेस आणि आनंदाने बहरत चाललीये आणि आता यामध्ये आणखी एका आनंदाची भर पडतेय ज्याचं निमित्त ठरणारे देवाच्या लाडक्या डॉलीबाई म्हणजेच डॉ मोनिका यांचा वाढदिवस.

डॉलीबाईंच्या वाढदिवसानिमित्त देवाने खास पार्टी ठेवली आहे. वाढदिवसाच्या या सेलिब्रेशनसाठी खास थीमही ठरवली गेलीये आणि ही थीम आहे अंडरवर्ल्डची दुनिया. यानुसार सर्वांनीच आपापले कॅरेक्टर्स ठरवलेत आणि तसे पोशाखही घातलेत. देवा, कबीर, राधा सगळेत यात सहभागी झालेत त्यामुळे डॉलीबाईही खुप खुश होतात. या पार्टीमध्ये देवा आणि डॉलीने साल्सा डान्स देखील केला आहे. या खास डान्सफॉर्म या खास एपिसोडसाठी सादर करण्यासाठी देवदत्त आणि श्वेताने खूप मेहनत देखील घेतली.

याबद्दल बोलताना देवदत्त नागे म्हणाला, "देवा म्हणजे फक्त बायसेप्स आणि मसल्स नाही तर देवाला डान्स देखील येतो आणि हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल."

"आम्ही खूप मेहनत घेऊन हा डान्सफॉर्म सादर करून हा साल्सा स्पेशल एपिसोड शूट केलाय. प्रेक्षकांना देखील आमचा परफॉर्मन्स आवडेल याची आम्हाला खात्री आहे", असं श्वेता शिंदे म्हणाली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser