आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जवळपास अडीच वर्ष 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेने मराठी कुटुंबातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. या मालिकेतील श्री आणि जान्हवी ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. श्री- जान्हवी आणि सहा सासू या सर्व व्यक्तिरेखांची चर्च तमाम प्रेक्षकांच्या घरात व्हायची. इतकंच काय तर श्री आणि जान्हवीचे प्रॉब्लेम्स देखील प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले इतकं या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठलं.
जान्हवीचा ‘काहीही हां श्री’ संवाद, तिचे बाळंतपण याविषयीचे भन्नाट विनोद सोशल मिडियावर बरेच गाजले. जान्हवीचे प्रेम त्यांचे लग्न, सहा सासवा, समंसज बाबा, खाष्ट सासू अशा अनेक गोष्टींनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या मालिकेचा प्रेक्षक आता पुन्हा आस्वाद घेऊ शकतात.
View this post on InstagramA post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on May 24, 2020 at 3:46am PDT
लॉकडाऊनमुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं असून प्रेक्षक नवीन मालिकांचे भाग पाहू शकत नाही आहेत म्हणून झी मराठी वाहिनीने 'जय मल्हार' आणि 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेसोबतच 'होणार सून मी ह्या घरची' या लोकप्रिय मालिकेचं पुनःप्रक्षेपण करायचा निर्णय घेतला आहे. ही मालिका प्रेक्षक दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रेक्षक बघू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.