आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीव्ही अपडेट:छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा 'जुळून येती रेशीमगाठी', या तारखेपासून मालिका येतेये प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • झी युवा वाहिनीवर ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.

एखादी व्यक्तिरेखा कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात आणि त्यानंतर थेट त्यांच्या मनात पोहचवते. कलाकार त्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक हिस्सा बनता. अशीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. या मालिकेची कथा, त्यातील व्यक्तिरेखा इतकंच नव्हे तर मालिकेचं शीर्षक गीत देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. ही मालिका सुरू झाल्यापासून ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांचं फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढत गेलं आणि प्रेक्षकांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला.

ललित आणि प्राजक्तासोबत ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनुभवी कलाकार होते आणि त्यांच्या व्यक्तिरेखेने देखील प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली.

ही मालिका आता पुन्हा एकदा पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. झी युवा वाहिनी हि प्रेक्षकांच्या पुरेपूर मनोरंजनासाठी सदैव तत्पर असते. जुळून येती रेशीमगाठी मालिकेची लोकप्रियता पाहता झी युवा वाहिनीने या मालिकेच्या पुनःप्रक्षेपणाचा निर्णय घेतला असून ही मालिका 27 जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.