आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारांची गगनभरारी:अशी झाली 'मन उडु उडु झालं' मालिकेतील कलाकारांची हॉट एअर बलूनची सैर, चित्रीत करण्यात आले सीन

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेतील या कलाकारांनी हॉट-एअर बलूनची सैर केली.

झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. उडू उडू म्हंटल्यावर आपल्या मनात येते ती म्हणजे उंच भरारी आणि या मालिकेतील इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी अशीच उंच भरारी घेतली आहे. हो हे खरं आहे, मालिकेतील या कलाकारांनी हॉट-एअर बलूनची सैर केली आणि आकाशाला गवसणी घातली.

मालिकेच्या प्रचारासाठी ही अ‍ॅक्टिव्हिटी करण्यात आली. यासाठी दोन्हीही कलाकार अगदी उत्सुक होते आणि त्यांनी या अ‍ॅक्टिव्हिटीचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच या हॉट-एअर बलूनमध्ये मालिकेचे काही सीन देखील चित्रित करण्यात आले आहेत जे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळतील.

याबद्दल बोलताना हृता म्हणाली, "मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की आम्ही अशी अ‍ॅक्टिव्हिटी केली हे माझ्या कल्पेने पलीकडचं होतं. मन उडू उडू झालं म्हणत आम्ही खरोखरच उडतोय."

या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला, "मन उडू उडू झालं या मालिकेला प्रेक्षक खूप उदंड प्रतिसाद देत आहेत याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. उडू उडू या शब्दाशी संदर्भ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या मालिकेमुळे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत आणि ही अ‍ॅक्टिव्हिटी देखील त्याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर असंच प्रेम करत राहावं आणि त्यांच्या अफाट प्रेमाने आमची मालिकादेखील लोकप्रियतेची गगनभरारी घेतेय असं म्हणेन."

बातम्या आणखी आहेत...