आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा आणि दिपूची जोडीप्रेक्षकांची आवडती आहे. सध्या प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि दिपू अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधार झालेला नाही. तिच्या या अवस्थेमुळे देशपांडे कुटुंबीय आणि इंद्रा खूप जास्त टेन्शनमध्ये आहेत.
रविवारी या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रसारित होणार आहेत. यात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट अँड टर्न बघायला मिळणार आहेत.
दिपूची प्रकृती खालावणार
दिपूची प्रकृती खूप खालावणार आहे. डॉक्टर देशपांडे कुटुंबियांना दिपूला काहीही होऊ शकतं असं म्हणतात. हे ऐकून इंद्राच्या पायाखालची जमीन सरकते आणि दिपूला सुखरूप परत मिळवण्यासाठी इंद्रा अग्निपरीक्षा द्यायचं ठरवतो. या अग्निपरीक्षेत त्याच्या मार्गात खूप अडथळे येतात. इंद्रावर काही गुंड हल्ला करतात. पण इंद्रा अडथळ्यांवर मात करू शकेल? इंद्राच्या अग्निपरीक्षेमुळे दिपूचे प्राण वाचणार का? हे मालिकेच्या या भागात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
सध्या या मालिकेतील एक गीत प्रचंड लोकप्रिय झालंय. बघुया त्याचीच ही एक झलक...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.