आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यू आयडिया:'माझा होशील ना' मालिकेच्या चाहत्यांना खास सरप्राईज, सई, आदित्य आणि नैना घेऊन आलेत वेबिसोड्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर दोन वेबिसोड्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'माझा होशील ना' या मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेचं वेगळं कथानक आणि त्यातील कलाकारांची फौज यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. मालिकेतील सई, आदित्य आणि नैना ही पात्रं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे त्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रसारित होत नाही आहेत. पण गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी आणि मुग्धा पुराणिक या कलाकारांची चाहत्यांना आठवण येतेय. म्हणूनच मालिकेच्या टीमनं प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज आणलं आहे. 

मालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर दोन वेबिसोड्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये सई, आदित्य आणि नैना एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताहेत.

  • दुसऱ्या एपिसोडमध्ये सई कॉफी करताना दिसतेय. हे सरप्राइज प्रेक्षकांनाही आवडलं आहे.

लवकरच तिसरा एपिसोडही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...