आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शूटिंग अपडेट:'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'माझ्या नव-याची बायको' या मालिकांचं चित्रीकरण सुरु,  कोविड-19 संदर्भातील सरकारच्या नियमांचं केलं जातंय सेटवर पालन  

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता प्रेक्षकांना लवकरचं त्यांच्या आवडत्या मालिका आणि कलाकार पुन्हा एकदा स्क्रिनवर दिसणार आहेत.

लॉकडाऊननंतर तब्बल तीन महिन्यांनी टीव्ही मालिकांच्या सेटवर सेटवर  पुन्हा एकदा लाइट कॅमेरा अॅक्शन हे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. कोविड 19 संदर्भात सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत हिंदीसोबतच मराठी मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

अलीकडेच झी मराठी वाहिनीवरील गाजत असलेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'माझ्या नव-याची बायको' या मालिकांच्या चित्रीकरणाचाही श्रीगणेशा झाला आहे. या दोन्ही मालिकांच्या सेटवरील काही छायाचित्रे समोर आली आहेत. यात सर्व कलाकार आणि टीम मेंबर्स सावधगिरी बाळत चित्रीकरण करताना दिसत आहेत. क्रू मेंबर्स मास्क, आणि फेस शील्ड घालून दिसत आहेत.

गणरायाला नमन करुन या कलाकारांनी आपल्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. 

निर्माता संजय खांबे व श्वेता शिंदे यांच्या उपस्थतीत मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा केला गेला.

या दोन्ही मालिकांचे नवे एपिसोड्स लवकरच प्रेक्षकांना बघता येणार आहेत.