आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेटेस्ट ट्रॅक:संजु आणि रणजीतची पुन्हा बांधली जाणार लग्नगाठ!, 'राजा रानीची गं जोडी' मालिकेला नवं वळण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका तासाचा महाएपिसोड 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे.

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत संजीवनी आणि रणजीतच्या आयुष्यात आलेल्या कसोट्यांना ते दोघे मिळून सामोरी गेले. कितीही खडतर प्रवास असला तरी देखील या दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही. कठीण परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते हे अगदी खरे. घराची प्रतिष्ठा आणि वडिलांकडून मिळालेल्या धमकीमुळे संजूने रणजीतपासून लपवलेले तिच्या वयाचे सत्य अखेर ढालेपाटील कुटुंबासमोर आले.

संजु आणि रणजीत यांच संपूर्ण आयुष्य यामुळे बदललं. हे कळल्यानंतर संपूर्ण ढाले पाटील कुटुंबाची अब्रू धुळीला मिळाली. रणजीतला या सगळ्या घडल्या प्रकारामुळे खूप मोठा धक्का बसला. या प्रकरणामुळे संजुने रणजितचा विश्वास पुर्णपणे गमावला. संजु रणजीतने त्यांचे मूल गमावले. ते एकमेकांपासून दुरावले. यामुळे राजा रानीचा सुखी संसार मोडणार की काय असे वाटत असतानाच रणजीतने एक निर्णय घेतला आहे आणि आता त्यामुळेच संजु – रणजीतची लग्नगाठ पुन्हा बांधली जाणार आहे.

संजु आणि रणजीतचे लग्न निर्विघ्नपणे पार पडेल ? रणजीत आणि कुसुमावतीचा विश्वास संजु कसा पुन्हा मिळवेल ? कसे त्यांचे मन जिंकेल ? देवाच्या कृपेने संजुला पुन्हा एक संधी मिळाली आहे, दैवाने संजीवनीचा हात रणजीतच्या हाती दिला आहे आता हे दोघे कसे नियतीवर मात करून राजा – रानीचा संसार करतील ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser