आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेलिवर्ल्ड:कठीण काळात कोण देणार दीपाची साथ?, 'रंग माझा वेगळा' मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वाभिमानी दीपाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं पण ते तिला उपभोगता येत नाही आहे. कारण खुद्द कार्तिकनेच दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत पितृत्व नाकारलं आहे. डीएनए टेस्ट कर अथवा घर सोडून जा असे दोन पर्याय असताना स्वाभिमानी दीपाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दीपाच्या रंगावर प्रश्न उठवले गेले पण ती शांत राहिली, तिच्या अस्तित्वावर प्रश्न उठवले गेले पण तरीही ती शांत राहिली मात्र जेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय उठवला गेला तेव्हा मात्र तिने याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. कार्तिकचं घर सोडून ती मोठ्या आशेने माहेरी आलीय. मात्र इथेही बाबांनी तिला पुन्हा सासरी जाण्याचाच सल्ला दिला आहे. त्यामुळे या कठीण काळात दीपाला कोण साथ देणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

आजवर इतिहासात अग्निपरीक्षा दिलेल्या असंख्य पतिव्रता आपण पाहिल्या आहेत. पण पतिव्रत्य सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का अग्नीपरीक्षा द्यावी या मताशी दीपा ठाम आहे. त्यामुळे दीपाचा पुढचा प्रवास नेमका कसा असणार याची उत्सुकता असेल.

बातम्या आणखी आहेत...