आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीस खेळ चाले 3:पूर्वाची लग्नघटिका समीप... जिंकणार माईची पुण्याई की शेवंता आणि अण्णांची सूड भावना?

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सोहळ्याची काही खास क्षणचित्रं मालिकेच्या चाहत्यांसाठी.

'रात्रीस खेळ चाले 3' या मालिकेने प्रेक्षकांना आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील विलक्षण वळणं प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवतात. प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे आणि त्यासाठी ते दोघे शर्थीचे प्रयत्न करत आहे.

सयाजी आणि कावेरी यांना वश करून आपला डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न असफल होत आहेत. त्यामुळे अण्णा आणि शेवंताचं लग्न जोपर्यंत होत नाही तो पर्यंत या वाड्यात कुठलंच मंगलकार्य होऊ द्यायचं नाही असं अण्णा आणि शेवंता मनाशी पक्क करतात.

इतक्यातच पूर्वाच्या लग्नाची तयारी अभिराम जोरात करतोय.

पण त्यातही काही तरी विघ्न येणार अशी चाहूल वच्छीला लागते. काहीही झालं तरी हे लग्न निर्विघ्न पार पाडायचं अभिराम ठरवतो. पूर्वाची लग्नघटिका समीप आली आहे.

या खास सोहळ्याची काही खास क्षणचित्रं मालिकेच्या चाहत्यांसाठी.

माई नेहमीच आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी झटत आल्या आहेत.

त्यांची पुण्याई यावेळी कामी येणार की अण्णा आणि शेवंताची सूड भावना नाईकांच्या सुखात मिठाचा खडा टाकणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

बातम्या आणखी आहेत...