आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामावर परतले आहेत!:रिपीट्स बंद ओरिजनल सुरु, या मालिकांचे नवे एपिसोड्स आणि नवी गोष्ट लवकरच येणार भेटीला

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकांचे नवीन भाग लवकरच प्रेक्षकांना बघता येणार आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं. मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, मोलकरीण बाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वैजू नंबर वन या मालिकांचे नवीन भाग लवकरच प्रेक्षकांना बघता येणार आहेत. 

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे आपल्या सहकलाकारांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा ऑनएअर गेला तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तीच धाकधूक आता शूटिंग सुरु झाल्यानंतर असणार आहे. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील. दीपाच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नवं पर्व सुरु होत आहे त्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात नवं पर्व सुरु होत आहे. दररोज रात्री आठ वाजता ‘रंग माझा वेगळा’ मालिका लवकरच पाहायला मिळणार आहे तेव्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी प्रचंड उत्सुक आहे, असं रेश्मा म्हणाली.

सर्वांची लाडकी आई म्हणजेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर सेट आणि सर्व सहकलाकारांना खूप मिस करत होत्या. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मनात प्रचंड उत्सुकता आहे. कधी एकदा सेटवर जातेय असं झालंय अशी प्रतिक्रिया मधुराणी यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...