आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छोट्या पडद्यावरील 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेमध्ये अखेर शंतनू आणि शर्वरीचा लग्नसोहाळा पार पडणार आहे. एकीकडे वर्हाड, नवरा मुलगा एका बेटावर, नवरी मुलगी दुसर्याच बेटावर आणि लग्न घडवून आणणारे भटजी तिसर्याच स्वतंत्र बेटावर. शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी झाल्या, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे नातं ऑनलाईनच जुळलं. काही विघ्न आली पण शर्वरीच्या साथीने हे दोघे त्यातून बाहेर पडले आणि आता रंगणार आहे टेलिव्हिजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा. लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये 21 नोव्हेंबर रात्री 10 वाजता होणार आहे.
एकदा का एका माणसावर जीव जडला की मग कितीही अडथळे, संकटे मार्गात येवोत माणूस त्यामधून मार्ग काढतोच. मग ते ऑनलाईन भेट ते थेट लग्न का असेना. तसं पाहिलं तर, तंत्रज्ञान आणि लग्न हे दोन काहीही संबंध नसलेले विषय एकत्र बांधले गेले आहेत आणि लग्नाची रंगत वाढत चालली आहे. असंच शंतनू – शर्वरीच्या या प्रवासात घडलं.
शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील ? हे बघणे नक्कीच इंट्रेस्टिंग असणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.