आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इट्स टाइम टू सेलिब्रेट:'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेने गाठला 250 भागांचा पल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मालिकेने 250 भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे.

रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेने आज 250 भागांचा पल्ला गाठला. मालिकेमधील लतिका आणि अभिमन्युची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही.

सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत, सोशल डिस्टिंसिन्ग आणि योग्य ती काळजी घेत मालिकेचे शूट सुरू आहे.

सध्या मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. अभिमन्युला दौलतने दिलेली नोकरीची ऑफर त्याने नाकारली असून दौलतच्या आईच्या म्हणण्यावरुन नोकरीची ऑफर अभी स्वीकारेल? याबद्दल अभी लतिकाला सांगू शकेल? लतिकाला हे कळल्यावर काय होईल? या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या येणा-या भागांमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत.