आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्वाभिमान' मालिकेत लग्नाची धामधूम:अखेर पल्लवी- शांतनूच्या आयुष्यात आले आनंदाचे क्षण, अडकणार लग्नाच्या बेडीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान' मालिकेत सुरू आहे पल्लवी आणि शांतनूच्या लग्नाची धामधूम.

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची सर्व आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. पल्लवी आणि शांतनूने संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने सप्तपदी घेतल्या.

लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळत आहे.

पल्लवी- शांतनूच्या आयुष्यात जरी आनंदाचे क्षण आले असले तरी मोठ्या आईच्या मनात मात्र नवं कटकारस्थान सुरू आहे.

सहा महिन्यांच्या आत पल्लवीचे सूर्यवंशी घराण्यासोबत असलेले संबंध तोडायला लावण्याची शपथ मोठ्या आईने घेतली आहे.

सध्या मालिकेतील लग्नाच्या विधीचे प्रोमो रिलीज करण्यात आले आहेत. एका प्रोमोमध्ये पल्लवीला शांतनूची उष्टी हळद लावली जात असल्याचे दाखवले गेले आहे.

एकंदरीत पल्लवी आणि शांतनूच्या लग्नानंतर स्वाभिमान मालिकेचे यापुढील भाग उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...