आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:रमा करू शकेल का आपल्या सौभाग्यच रक्षण?, 'स्वामिनी' मालिका आता रंजक वळणावर

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माधवराव रमाबाईं यांच्यात प्रेम फुलेल का ?

स्वामिनी मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडात, आणि पेशवाई संस्कारात घडत आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आणि शनिवारवाड्यात आल्या. शनिवार वाड्यातील रमाबाईंचा प्रवास तसा कठीणच. रमाबाईंच्या साथीला पार्वतीबाई, नानासाहेब आहेतच. पण गोपिकाबाईंसोबतच आता त्यांना माधवरावांचे देखील मन जिंकायचे आहे. या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना त्यांना सामोरी जावे लागले, आणि अजूनही जावे लागते आहे.

त्यांच्यासमोर आलेल्या अनेक कठीण प्रसंगामधून आजवर रमाबाई नेहेमीच बाहेर पडल्या. माधवरावांचा अबोला, गोपिकाबाईंची नाराजगी आणि आनंदीबाईंची कट कारस्थान ज्याविषयी रमाबाई अनभिज्ञ आहेत, पण कधी पार्वतीबाई तर कधी सावित्रबाईंच्या मदतीने आजवर रमाबाईंनी यातून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न केला आणि यामध्येच आता रमाबाईंची सगळयात मोठी कसोटी लागणार आहे.

माधवरावांवर अचानक हल्ला होणार असून रमाबाई माधवरावांना कशा वाचवतील? त्या आपल्या सौभाग्याच रक्षण कसे करतील? हे बघणे रंजक असणार आहे. या प्रसंगानंतर रमाबाई – माधवराव यांच्यातील दुरावा मिटेल? गोपिकाबाईंचे मन रमाबाई जिंकू शकतील? हे लवकरच कळेल.

बातम्या आणखी आहेत...